शहरातून विवाहिता झाली बेपत्ता ; माहेरच्या मंडळींनी सासरच्यांना बदडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली ही माहिती मिळताच मुलीच्या घरच्या मंडळींनी क्रूझर गाडी मधून शहरात येऊन मुलीच्या सासरच्या मंडळींना बदडले. पुंडलीक नगर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. तर बेपत्ता असलेल्या विवाहितेचा पोलीस शोध घेत आहे. शिवकण्या राजेश चव्हाण असे बेपत्ता 20 वर्षीय वीवाहितेचे नाव आहे.

गबु धनसिंग राठोड,राजू गबु राठोड,विजय गबु राठोड,सोनू राजू राठोड, क्रूझर चालक व एक अज्ञात अशा सासरच्या सहा जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड वर्षांपूर्वी शिवकण्याचा विवाह चव्हाण कुटुंबात झालं होतं. तीच डी.एड. च शिक्षण सुरू असल्याने ती सोमवारी सकाळी कॉलेजला जाते म्हणून घरातून निघाली. मात्र घरी आलीच नाही,ही बाब शिवकण्याच्या माहेरच्या मंडळींना समजताच सोमवारी संध्याकाळी एका क्रूझर मधून आलेल्या घोळक्याने चव्हाण कुटुंबावर हल्ला चढविला. यामध्ये विवाहितेचा दिर अक्षय उत्तमराव चव्हाण आणि सासू जखमी झाले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे साह्ययक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह वेळीच धाव घेऊन दोघांनाही जमावाच्या तावडीतून सुटका केली.

या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. विवाहितेचा अद्यापही शोध लागलेला नसून वरील वर्णनाची महिला आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पुंडलीकनगर पोलिसांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment