मेरी कोम विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत

Marry kom
Marry kom
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | तब्बल पाच वेळेस विश्व विजेती ठरलेल्या मेरी कोमने एआयबीआय महिला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत आज मंगळवारी उपांत्य फेरीत (सेमी फायनलमध्ये) प्रवेशनिश्चित केला आहे. मेरी कोमने चीनच्या यू वु वर 5-0 ने शानदार विजय नोंदवित उपांत्य फेरी गाठली. या विजयासह मेरी कोमने एआयबीआय महिला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे.

मेरी कोम गुरुवारी होणाऱ्या सेमीफायनल सामन्यात उत्तर कोरियाच्या ह्यांग मि किमशी भिडणार आहे. यापूर्वी झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत मेरी कोमने ह्यांग मि किमचा पराभव केला होता. दरम्यान मेरी कोमने आज आपल्या आक्रमक शैलीत खेळत, चीनी बॉक्सर यू वु ला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दोन्ही हाताने ठोसे मारुन मेरीने गुण मिळवले.

पुढील सामन्याबद्दल तिला विचारलं असता, ती म्हणाली सेमीफायनलमध्ये माझा जिच्यासोबत सामना होणार आहे, त्या ह्यांग मि किमला मी आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते. तरी मी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेन, असेही मेरी यावेळी म्हणाली.