साताऱ्याच्या शहीद जवान तेजस मानकरवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पंजाबच्या बठिंडामध्ये सैन्य तळावर दि. 12 एप्रिलला झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील करंदोशी गावातील तेजस मानकर या 22 वर्षाचा जवानाला वीरमरण आले. त्याचे पार्थिव रविवारी गावी करदोशीत आणण्यात आले. पार्थिवाची राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर करंदोशीत त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी तेजस मानकर याला अभिवादन केले.

रविवारी शहीद जवान तेजस मानकरचे पार्थिव करदोशीत आणण्यात आल्यानंतर ‘शहीद जवान तेजस मानकर अमर रहे,’ च्या घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. पार्थिव घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता. त्यानंतर पोलिस विभागाच्यावतीने जवान तेजस मानकरला अखेरची मानवंदना देण्यात आली. त्याचा मोठा भाऊ मेजर ओंकार मानकर याने तेजस च्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.यावेळी पंचक्रोशीतील अलोट जनसमुदाय आणि नेते मंडळी उपस्थितीत होते. वीरमरण आलेल्या तेजस मानकरच्या वडिलांनी बटिंडा येथे झालेल्या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.

यावेळी साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील या दोघांनी सातारा जिल्हयातील करंदोशी गावास भेट दिली. दोघांनी शहीद जवान तेजस मानकर याचा पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.

जवान तेजस यांचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते शशिकांत मानकर हे सुद्धा सैन्य दलात सेवा बजावत आहेत. आई मनीषा मानकर गृहिणी आहेत. सैन्य दलातून देशसेवा करण्याची परंपरा मानकर कुटुंबात आहे. 2 वर्षापूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाले होते. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची पंजाब भटिंडा येथे नियुक्ती करण्यात आली होती.

Udayanraje Bhosale and Srinivas Patil

अंत्यसंस्कारापूर्वी तेजसचा आर्कविवाह

साताऱ्यातील शहीद जवान तेजस यांचे पार्थिव त्यांच्या करंदोशी घरी आणण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता. तेजस हे अविवाहित असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचा आर्कविवाह करण्यात आला. यावेळी मंगलाष्टका म्हणून अक्षदा वाहण्यात आल्या. यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ मेजर ओंकार मानकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.