Maruti Ertiga CNG : Maruti Suzuki च्या ‘या’ CNG कारला ग्राहकांची मोठी मागणी; खास कारण काय?

Maruti Ertiga CNG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल आणि (Maruti Ertiga CNG) डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा कल हा CNG गाड्यांकडे वळला आहे. यामुळे CNG गाड्यांची मागणीही वाढली आहे. याचा सर्वाधिक फायदा मारुती सुजूकीला झाला आहे. मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 पेक्षा जास्त CNG कार आहेत. पण या सगळ्यात मारुती सुझुकी एर्टिगाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Maruti Ertiga CNG

वेटिंग पिरिडी 9 महिन्यांपेक्षा जास्त – (Maruti Ertiga CNG) 

Maruti Suzuki च्या सर्वोत्तम MPV Ertiga CNG (ZXi) ची एक्स-शोरूम किंमत 11.60 लाख रुपये आहे. ग्राहक या (Maruti Ertiga CNG) ७ सीटर कारसाठी शोरूम्समध्ये गर्दी करू लागले आहेत. या कारला एवढी मागणी वाढत आहे की, गाडीचा वेटिंग पिरिडी 9 महिन्यांपेक्षा जास्त झाला आहे. ज्यादा मागणीसोबत कंपनीला सेमीकंडक्टरची कमतरता देखील भेडसावत आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

Maruti Ertiga CNG

मारुती सुझुकीची Ertiga CNG मॉडेल दोन प्रकारांमध्ये ऑफर करते – VXI(O) आणि ZXI(O). या गाड्यांची किंमत अनुक्रमे 10.50 लाख रुपये आणि 11.60 लाख रुपये आहे. या MPV मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे (Maruti Ertiga CNG)  इंजिन CNG मोडमध्ये सुमारे 87 Bhp आणि 122 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. Ertiga CNG 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.