Maruti Suzuki Alto : मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकीच्या कारला (Maruti Suzuki Alto) भारतात कोणतीच तोड नाही. ग्राहकांना कमी किमतीतही उत्तम मायलेज देणारी कार म्हणून आपण मारुती सुझुकी कंपनीकडे पाहतो. अलीकडच्या काळात मारुतीने आपल्या काही जुन्या मॉडेलच्या गाड्या नव्या अपडेटसह लॉन्च केल्या आहेत. त्यातच आता गेल्या 20 वर्षांपासून ग्राहकांच्या आवडीची असलेली मारुतीची अल्टो ही कार आता आपल्याला नव्या अवतारात पाहायला मिळेल. अल्टो हि देशातील सर्वात प्रसिद्ध कार म्हणून ओळखली जाते.

मारुती अल्टोच्या या नव्या अवतारामुळे अल्टो केवळ आकारानेच मोठी होणार नाही तर पूर्वीपेक्षा जास्त केबिन जागाही मिळेल. मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) च्या या नवीन मॉडेल मुळे त्यांच्या विक्रीत नक्कीच भर होणार यात शंकाच नाही. या कारला भारतीय बाजारपेठेत तगडी स्पर्धा आहे. या गाड्या किफायतशीर तर आहेतच पण त्यांचे मायलेजही खूप मजबूत आहे.

Maruti Suzuki Alto

कारचे मायलेज आणखी वाढेल-

मारुतीची ही नवीन अल्टो सुझुकी हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे, ज्यामुळे या कारचे मायलेज आणखी वाढेल आणि कारचा लोड पूर्वीपेक्षा कमी असेल. असेही म्हंटल जात आहे की, ही नवीन अल्टो मारुती सुझुकी S-Presso प्रमाणे तयार केली जात आहे.

Maruti Suzuki Alto

काय आहेत वैशिष्ट्ये -(Maruti Suzuki Alto)

मारुतीच्या या नवीन अल्टोमध्ये (Maruti Suzuki Alto) कीलेस एंट्री, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे अनेक वैशिष्ट्ये असू शकतात. सध्याच्या मारुती सुझुकी ऑल्टोची किंमत 3.15 लाख आहे. तर नव्या टॉप मॉडेलची किंमत 4.82 लाखांपर्यंत जाते . उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि दमदार लूक यामुळे मारुतीच्या या नव्या अल्टोच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मारुती अल्टो ची नवी गाडी बाजारात आल्यानंतर नक्कीच इतर गाड्यांशी या कारची तगडी फाईट होऊ शकते.

Maruti Suzuki Alto

796 cc पेट्रोल इंजिन-

अल्टोच्या या नव्या अवतारात कोणते इंजिन उपलब्ध असेल याची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही, परंतु मारुती सुझुकी (Maruti Suzuki Alto) सध्याच्या मॉडेलसह 3 सिलेंडर 796 सीसी पेट्रोल इंजिन देईल असे मानले जात आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि 47 bhp आणि 69 Nm पीक टॉर्क बनवते. असा अंदाज आहे की मारुती सुझुकी 2022 अल्टो सोबत 1-लिटर के-सिरीज इंजिन देखील देऊ शकते, हे इंजिन 67 bhp पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क बनवते जे कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनी नवीन अल्टोचे सीएनजी प्रकारही बाजारात आणू शकते.

हे पण वाचा : 

Maruti Suzuki Car Price : मारूतीने बदलल्या सर्व 9 गाड्यांचा किमती; चेक करा कोणती गाडी किती रुपयांना

New Mahindra Scorpio : नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लॉंच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये

Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट

Bajaj CT 100 : किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 लिटर पेट्रोल मध्ये 90 किमी जाते

Whatsapp च्या या फिचरसाठी आता मोजावे लागणार पैसे; तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या

Leave a Comment