हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी आपली लोकप्रिय गाडी Brezza (Maruti Suzuki Brezza 2022) चे 2022 मॉडेल लॉन्च केले. गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. कारमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे कंपनीला 8 दिवसात कारसाठी 45000 बुकिंग मिळाले आहेत. मारुती सुजूकीची नवी brezza नुकत्याच लॉन्च झालेल्या 2022 Hyundai Venue शी थेट स्पर्धा होऊ शकते .
इंजिन, गिअरबॉक्स आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये-
नवीन ब्रेझाला (Maruti Suzuki Brezza 2022) पुन्हा तयार केलेले के-सीरीज पेट्रोल इंजिन मिळते, जे कमी उत्सर्जनासाठी ओळखले जाते. नवीन SUV मध्ये 20.15 kmpl पर्यंत मायलेज असेल . कारमध्ये एकूण 6 एअरबॅग्ज आहेत. याशिवाय यात हेड अप डिस्प्ले आहे. तसेच 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, हिल होल्ड असिस्टसह ईएसपी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे फीचर्स पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. 2016 मध्ये पहिल्यांदा मारुतीने आपल्या Breeza चे लॉंचिंग केलं होत तेव्हापासून कंपनीचे 7.5 लाख ब्रेझा ग्राहक आहेत. देशातील टॉप-10 कारमध्ये या कारचा क्रमांक लागतो.
45 पेक्षा जास्त फीचर्स – (Maruti Suzuki Brezza 2022)
मारुती सुझुकीच्या नव्या Brezza मध्ये वायरलेस चार्जर सिस्टम आहे. ज्याला बोल्ड आणि डायनॅमिक अलॉय व्हील्स मिळतात. कारमधील ठळक नवीन फ्रंट ग्रिल डिझाइन याला उत्कृष्ट लुक देते. त्यात एलईडी दिवे आहेत. कारमध्ये 9-इंचाची स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. मारुती सुझुकीच्या नव्या Brezza मध्ये 45 पेक्षा जास्त फीचर्स आहेत. ज्यामध्ये 20 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
सहा रंग आणि चार ट्रिममध्ये उपलब्ध-
तुम्ही नवीन ब्रेझा कार (Maruti Suzuki Brezza 2022) सहा रंगांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीने ही कार LXI, VXI, ZXI आणि ZXI + या चार ट्रिममध्ये सादर केली आहे.
काय असेल किंमत-
नवीन मारुती ब्रेझाची एक्स-शोरूम (Maruti Suzuki Brezza 2022) किंमत 7.99 लाख रुपये पासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी 13.96 लाख रुपयांपर्यंत जाते. या एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले असून 11,000 रुपयांमध्ये बुक करता येईल. आत्तापर्यंत मारुती सुझुकीला या SUV साठी अवघ्या 8 दिवसात 45,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.
हे पण वाचा :
Smartphone घेताय जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील हे सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा
WhatsApp द्वारे Android फोनवरून टायपिंग न करता पाठवा मेसेज !!!
Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत
Honda N7X : होंडाची ही नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट; जाणून घ्या किंमत अन लॉंचची तारीख