Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Maruti Suzuki Grand Vitara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुप्रतिक्षित मारुती (Maruti Suzuki Grand Vitara) सुजूकी ग्रँड विटारा अखेर भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ग्रँड विटारामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा प्लस, अल्फा आणि अल्फा पल्स असे व्हेरिएंट आहेत. ही SUV पेट्रोल आणि हायब्रीड इंजिन दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी ही कार आपल्या नेक्सा शोरूममधून विकणार आहे. चला जाणून घेऊया याला नव्या SUV चे खास फीचर्स आणि किंमत याबाबत….

फीचर्स –

मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) मध्ये लिथियम आयन बॅटरी आहे. सनरूफ फीचरसोबतच कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. डिझाईनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ,गाडी मध्ये मोठे फ्रंट फॅसिआ, क्रोम-लाइन असलेले हेक्सागोनल ग्रिल, तीन-पॉइंट एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प, बंपर-माउंटेड मुख्य हेडलॅम्प क्लस्टर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत .

Maruti Suzuki Grand Vitara

दुसरीकडे, केबिन फीचर्स (Maruti Suzuki Grand Vitara) बाबत म्हंटल तर 360-डिग्री कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले, 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मध्यभागी पूर्ण-रंगीत डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांचा समावेश आहे. कारमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल-डिसेंट कंट्रोल यासारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Maruti Suzuki Grand Vitara

इंजिन – (Maruti Suzuki Grand Vitara)

कंपनीने या नवीन (Maruti Suzuki Grand Vitara) SUV मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 115 hp पॉवर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते. तर सौम्य हायब्रिड व्हर्जन मध्ये या कारचे इंजिन 103 hp पॉवर आणि 135 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार मजबूत हायब्रिड मोडमध्ये सुमारे 28 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

Maruti Suzuki Grand Vitara

किंमत –

मारुती ग्रँड व्हिटाराच्या सिग्मा (Maruti Suzuki Grand Vitara) व्हेरियंटची किंमत 10.45 लाख रुपये, डेल्टा व्हेरिएंटची किंमत 11.90 लाख रुपये, Zeta व्हेरिएंटची किंमत 13.89 लाख रुपये, अल्फा व्हेरिएंटची किंमत 15.39 लाख रुपये आणि ड्युअल टोन रंग पर्यायांमध्ये अल्फा आणि अल्फा प्लस 15.55 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, मोनोटोन कलर ऑप्शन आणि ग्रँड विटाराच्या स्मार्ट हायब्रीड पॉवरट्रेन ऑप्शनमधील डेल्टा व्हेरियंटची किंमत 13.40 लाख रुपये, झेटा व्हेरियंटची किंमत 15.39 लाख रुपयांपर्यंत, अल्फा व्हेरियंटची किंमत 16.89 लाख रुपयांपर्यंत आणि अल्फा व्हेरियंटची किंमत 16.89 लाख रुपये आहे. ड्युअल टोन कलर ऑप्शनमधील अल्फा व्हेरियंटच्या किमती रु. 17.05 लाखांपर्यंत आहेत. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.