गॅस दरवाढी विरोधात सिलेंडर दारात ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अन किसान सभेचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महागाईच्या विरोधात घरगुती सिलेंडर घराच्या दारात ठेवुन आज जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला पुरुष सहभागी होउन या दरवाढीस विरोध दर्शविला. केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन घरगुती सिलेंडरच्या किंमती दुपटीपेक्षा जास्त झाल्या आहेत. 2014 साली 450 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज 920 ला झाला आहे. शिवाय त्यावर मिळणारी सबसिडी देखील बंद झाली आहे.

तेच पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आहे. यावरुन सरकार जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहे हेच यावरुन सिद्ध होत आहे. अशा सरकारचा निषे:ध करावा तेवढा थोडाच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे, वाहतुकीच्या दरात वाढ झाली, पर्यायाने डाळी, खाद्यतेल, अन्नधान्य, भजीपाला या सगळ्या गरजेच्या वस्तु महागल्या आहेत. यावर सरकार कोणताही मार्ग काढताना दिसत नाही.

उलट देशाचे पंतप्रधान, मंत्री हे निवडणूक जिंकण्यामध्ये व्यस्थ असल्याचे दिसत आहे. म्हणुन आज जिल्हाभर या गगनाला भिडलेल्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मर्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन इ. संघटनांचे कर्यकर्ते सहभागी झाले होते. कॉ. उमेश देशमुख, रेहाना शेख, हणमंत कोळी, तुळशीराम गळवे, मिना कोळी, जोहरा नदाफ, दिलशाद टिनमेकर, सुरेखा जाधव, रियाज जमादार, दिलीप कांबळे, सुधिर गावडे, नितीन पाटील, जावेद मुजावर नेतृत्व केले.

Leave a Comment