पंचांच्या निर्णयावर बॉक्सर ‘मेरी कोम’ नाराज, सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं. उपांत्य फेरीत टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने मेरी कोमला पराभूत केलं. या पराभवामुळे मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. मात्र सामना संपल्यानंतर काही मिनीटांमध्येच मेरी कोमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंचांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी बोलून दाखवली.

१ विरुद्ध ४ च्या फरकाने पंचांनी टर्कीच्या बुसेन्झच्या खात्यात आपली मतं टाकली.सामना संपल्यानंतर निर्णयावर नाराज झालेल्या मेरी कोमच्या प्रशिक्षक वर्गाने सामन्याच्या तांत्रिक समितीकडे दाद मागितली. मात्र पंचांची मत २ विरुद्ध ३ किंवा १ विरुद्ध ३ अशा स्वरुपात असली तरच, पराभूत उमेदवाराचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. उपांत्य सामन्यात टर्कीच्या खेळाडूच्या खात्यात ४ पंचांनी आपली मत टाकल्यामुळे भारताचं हे अपिल फेटाळण्यात आलं. ज्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमचा प्रवास अखेरीस संपुष्टात आला आहे.

दरम्यान सहावेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या भारताच्या मेरी कोमने ५१ किलो वजनी गटात थायलंडच्या जुतुमास जितपाँगवर ५-० असा विजय मिळवित जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीमध्ये तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे. उपांत्य फेरीतमध्ये झालेल्या लढतीमध्ये तिला टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने पराभूत केले. यानंतर तिने नाराजी व्यक्त केली.

इतर काही बातम्या- 

 

Leave a Comment