युवा सोनार संघटनेच्यावतीने हजार वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | युवा सोनार संघटनेतर्फे शासकीय घाटी रुग्णालय येथे गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना एक हजार पुरी भाजीचे पॅकेट आणि एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाचे सावट आता कमी होताना दिसत आहे जगभरामध्ये 14 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे . नियमही कठोर करण्यात आलेले आहे.  औरंगाबाद शहरांमधील शासकीय घाटी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नातेवाईक औरंगाबाद जिल्ह्यातून तसेच इतरही जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी शासकीय घाटी येथे येतात. शहरांमध्ये लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा व हॉटेल बंद आहे त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होते.

ग्रामीण भागातून येणाऱ्या वर्ग जास्त प्रमाणात येत असल्याने काही नातेवाईक मास देखील वापरत नाही त्यामुळे युवा सोनार संघटना यांच्या वतीने घाटी मध्ये हजार पुरी भाजीचे पाकीट व हजार मासचे वाटण्यात करण्यात आले आहे.

यावेळी उपक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य दहिवाळ , संस्थापक उपाध्यक्ष शुभम दहिवाळ, संस्थापक सचिव अजय जडे, संस्थापक कार्याध्यक्ष निखील महाले, अविनाश उडानशिव, कार्तिक उदावंत, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शहाणे, जिल्हा सचिव गजानन सोनार, दिनेश दहिवाळ, शहराध्यक्ष प्रणित जोजारे, अक्षय बागुल, युवराज दहिवाळ , गोविंद सोनवणे, महेश डहाळे यांनी परिश्रम घेतले

Leave a Comment