शरीरात बाहेरचा गंध येऊ नये म्हणून काळ्या प्लेगमध्ये वापरलेले मास्क सुगंधी औषधी वनस्पतींनी भरलेले होते

black plague
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एक काळ असा होता जेव्हा चेहरा झाकण्यासाठी वापरलेले मुखवटे फक्त बँक चोर, पॉप स्टार आणि आरोग्याबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगणारे जपानी पर्यटक वापरत असत. पण आजच्या युगात मुखवटे घालणे इतके सामान्य झाले आहे की त्याला ‘न्यू नॉर्मल’ नवीन वास्तव म्हटले जाते. जबरदस्ती का असेना पण आपण मास्क वापरतोय. लोकांनी मास्क वापरावा म्हणून सरकारने त्यावर दंड आकारणी पण सुरू केलीय. आणि अजून काही काळात ती एक फॅशन म्हणून पण ट्रेंडला येऊ शकते.

ब्लॅक डेथ प्लेग पहिल्यांदा युरोपमध्ये 14 व्या शतकात पसरू लागला. 1347 ते 1351 दरम्यान या आजारामुळे येथे 250 लाख लोक मरण पावले. यानंतर, डॉक्टरांनी येथे विशेष वैद्यकीय मास्क वापरण्यास सुरवात केली. काही लोकांचा असा विश्वास आहे की विषारी हवेमुळे मानवी शरीरात असंतुलन सुरू झाले. अशा परिस्थितीत, प्रदूषित हवा शरीरामध्ये पोहोचू नये म्हणून लोकांनी आपले चेहरे झाकून घेतले किंवा सुवासिक अत्तरे आणि फुले घेऊन घराबाहेर पडायला सुरुवात केली.

शरीरात बाहेरचा गंध येऊ नये म्हणून काळ्या प्लेगमध्ये वापरलेले मास्क सुगंधी औषधी वनस्पतींनी भरलेले होते. नंतर, असे मास्क वापरणे चालू राहिले ज्यामध्ये सुगंधी औषधी वनस्पती भरल्या गेल्या. 1665 च्या महामारी दरम्यान, रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी चामड्याचे अंगरखा, डोळ्यावर काचेचे ग्लास, हातात हातमोजे आणि डोक्यावर टोपी घातली. ते त्या काळातील पीपीई किटसारखे होते. म्हणजे आपल्याला हे सगळं जरी नवीन वाटत असेल तरी हे खूप जून आहे. आपण खूप पूर्वीपासून हे सगळं वापरत आलो आहोत. आणि इथून पुढेही वापरत राहणार आहोत. कारण, मास्क वापरने ही सध्याची गरज झाली आहे.