राम मंदिर बांधल्यास दिल्ली ते काबूल विध्वंस माजवू; जैश-ए-मोहम्मदची धमकी

Masood Azhar on Ram mandir babri masjid issue
Masood Azhar on Ram mandir babri masjid issue
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेता, सर्वच हिंदू संघटना आणि पक्षांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच आरएसएस आणि विहिंपनेही अयोध्येतील विवादित जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा चांगलाच चवताळला आहे. ‘जर तुम्ही राम मंदिर उभारलं तर दिल्लीपासून काबूलपर्यंत विध्वंस माजवू’ अशी धमकी त्याने दिली आहे. अजहरचा एक व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट करण्यात आला आहे.

नऊ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये जर हिंदुस्थानने बाबरी मशीदच्या जागी राम मंदिर उभारलं तर दिल्लीपासून काबूलपर्यंत विध्वंस माजवू आणि त्यासाठी सर्व मुस्लीम तरुण तयार आहेत अशी धमकी दिली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडल्याने दहशतवादी संघटना बिथरल्या आहेत. यामुळेच अजहरने या धमक्या दिल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी देशातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचे म्हटले होते. दारुल उलुम देवबंद हे शिक्षण नव्हे दहशतवाद्यांचा अड्डा आहे. हाफिज सईद, बगदादी हे देखील देवबंदचे विद्यार्थी होते, देशात ३० लाख मशिदी उभ्या राहतात, मग अयोध्येत राम मंदिर का नाही, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते.