Wednesday, March 29, 2023

पाकिस्तानात मशिदीत मोठा स्फोट; 30 जणांचा मृत्यू तर 50 जखमी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानातील एका मशिदीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 50 जण जखमी झाले आहेत. जिओ न्यूज, नुसार पेशावरच्या मशिदीत नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी बाजारातील मशिदीमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच बचाव पथक तेथे पोहोचले आणि जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथकासोबतच आसपासच्या लोकांनीही जखमींना मदत केली. 50 जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा दलांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. तेथे तपास सुरू आहे.

- Advertisement -

आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यात दोन हल्लेखोर सामील असल्याचे पेशावर पोलिसांनी सांगितले आहे. आधी दोघांनी मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थांबवल्यानंतर पोलिसाला गोळ्या घातल्या. स्फोटापूर्वी झालेल्या गोळीबारात एक पोलीस शहीद झाला, तर इतर जखमी झाले.