हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बांगलादेशाची (Bangladesh) राजधानी ढाका येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. गुरुवारी एका रेस्टॉरंटमध्ये रात्री 9:50 च्या सुमारास आग लागल्यामुळे सर्वत्र गोंधळ पसरला. ही आग काही क्षणातच वरच्या मजल्यांपर्यंत पसरत गेली. त्यामुळे इमारतीत अडकलेल्या 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आता या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
75 जणांचा बाहेर काढण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ढाकामध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली होती. या आगीने काही क्षणातच रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावर ताबा मिळवला. यामुळे रेस्टॉरंटसह कपड्यांचे तेथील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशामक दलाला मिळतात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर त्यांना सात मजली इमारतीतून 75 लोकांना बाहेर काढण्यात यश आले. यातील 42 लोक बेशुद्ध अवस्थेत होते.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 13 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या सर्वांच्या प्रयत्नातूनच रेस्टॉरंटमध्ये अडकलेल्या अनेक जणांची सुखरूप सुटका झाली. मात्र यातील 33 जणांचा ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये दहा जणांनी आपला जीव गमावला. आता या दोन्ही हॉस्पिटलमध्ये 22 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सर्वात प्रथम ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. यामुळे घाबरलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडायला. या आगीपासून वाचण्यासाठी लोक वरच्या इमारतीकडे धावले. मात्र बघता बघता ही आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. यानंतर बचावासाठी काही लोकांनी इमारतीच्या काचा फोडून खाली उड्या मारल्या. पुढे, अग्निशामक दलाने येऊन रेस्टॉरंटमध्ये अडकलेल्या इतर लोकांना सुखरूपरीत्या बाहेर काढले.