अमेरिकेच्या डल्लास मध्ये गोळीबार, 3 ठार तर 2 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डल्लास । अमेरिकेच्या डल्लासजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन लोकं जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारात कुठल्याही संशयिताची ओळख पटली नसल्याचे डल्लास पोलिसांनी सांगितले. गोळीबार का झाला हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गोळीबारात पाच जणांना गोळ्या घालण्यात आल्या
गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांना आढळले की, पाच जणांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यापैकी तिघांना मृत घोषित करण्यात आले. यापूर्वी रविवारी पहाटे जवळच असलेल्या फोर्ट वर्थमध्ये झालेल्या गोळीबारात आठ जण जखमी झाले.

फोर्ट वर्थमध्ये गोळीबार
आत्तापर्यंत पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडितांची नावे त्यांच्या कुटुंबीयांना सांगितल्याखेरीज जाहीर केली जाणार नाहीत. रविवारी पहाटे जवळच असलेल्या फोर्ट वर्थमध्ये झालेल्या गोळीबारात सुमारे आठ लोकं जखमी झाले. फोर्ट वर्थमधील पोलिसांचे म्हणणे आहे की, अचानक कोणीतरी कार वॉशजवळ या लोकांना गोळ्या घालण्यास सुरवात केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment