नाहीतर..सचिन डबल सेंचुरी करूच नसता शकला; डेल स्टेनचा ग्वालियर वन-डेबाबत अजब खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । ग्वालियरच्या मैदानात २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यात सचिन तेंडुलकरने डबल सेंचुरी मारत एक पराक्रम केला होता. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात डबल सेंचुरी करणार सचिन हा पहिला खेळाडू ठरला होता. वन-डेमध्ये डबल सेंचुरी करणं तोपर्यन्त अशक्य असंच मानलं जात होत. पण मास्टर ब्लास्टर सचिननं डबल सेंचुरी पूर्ण करताना आफ्रिकन गोलंदजांची अक्षरशः धुलाई केली होती. सचिनची ती इनिंग कोणाही भारतीय किंवा जगातील कुठलाही क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. मात्र, सचिनच्या याच खेळीवर त्या सामन्यात सचिनकडून सपाटून मार झालेल्या आफ्रिकी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एक अजब दावा केला आहे. डेल स्टेनने केलेल्या दाव्यानुसार या सामन्यात स्टेनने सचिननला द्विशतकाआधी काही धावा असताना बाद केलं होता, मात्र पंच इयन गुल्ड यांनी सचिनला नॉटआऊट घोषित करत जीवदान दिलं.

डेल स्टेन Sky Sports वाहिनीच्या पॉडकास्टमध्ये या सामन्याविषयी बोलताना तो म्हणाला, “ग्वालियारच्या सामन्यात सचिनने आमच्याविरुद्ध पहिल्यांदा वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं. या सामन्यात मला आठवतंय सचिन १९०+ वर खेळत असताना मी त्याला पायचीत पकडलं होतं. मी सचिनविरोधात जोरदार अपीलही केलं, पण पंच इयन गुल्ड यांनी माझं अपील फेटाळून लावलं.

तो पुढे म्हणाला, ” सचिनला नॉटआऊट दिल्यानंतर मी गुल्ड, यांना तूम्ही आऊट का दिलं नाहीत असं विचारलं…त्यावेळी गुल्ड यांच्या चेहऱ्यावर….मित्रा आजुबाजूला बघ, आता मी सचिनला आऊट दिलं तर मी हॉटेलवर पोहचू शकणार नाही असे भाव होते.” सचिनच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने या सामन्यात ३ गड्यांच्या मोबदल्यात ४०१ धावांचा पल्ला गाठला होता. दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवलं नाही, १५३ धावांनी भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”