वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. .

येल स्कूल ऑफ मेडिसिनसह अमेरिकेच्या संशोधकांच्या पथकाने असे म्हटले आहे की लॉकडाउनमध्ये देण्यात आलेल्या सूट नंतर ही रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवल्यास भारत कोविड -१९ ने होणाऱ्या संभाव्य मृत्यूंचे प्रमाण हे ६३ टक्क्यांनी कमी करू शकेल. जोपर्यंत कोरोनावरची लस तयार होत नाही किंवा त्याचावरील प्रभावी उपचार समोर येत नाही तोपर्यंत ही रेड लाइट क्षेत्रे बंद राहिल्यास भारतात नवीन संक्रमणाचा धोका कमी होईल. त्यामुळे त्यांनी ही रेड लाईट क्षेत्रे बराच काळ बंद ठेवण्याची शिफारस केली आहे.

या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे पाऊल उचलण्यामुळे भारतात ४५ दिवसांतच ७२ टक्के संसर्गाची प्रकरणे कमी होतील. भारत सध्या लॉकडाऊन ४.० च्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि यामुळे भारत सरकारला सार्वजनिक आरोग्य तसेच अर्थव्यवस्थेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यास अधिक वेळ मिळेल. या अहवालानुसार, लॉकडाऊन संपल्यानंतरच्या पहिल्या ६० दिवसांत होणाऱ्या मृत्यूची संख्या ६३ टक्क्यांनी कमी होईल.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) नुसार भारतात या व्यवसायात सुमारे ६३७५०० महिला असून रोज सुमारे ५ लाख ग्राहक या रेड लाईट भागात येतात. कोविड -१९ चा संसर्ग या रेड लाईट भागात झपाट्याने पसरेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या व्यवसायात सोशल डिस्टंसिंग पाळले जाऊ शकत नाही, यामुळे संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका असेल. हे संक्रमित ग्राहक देशातील इतर कोट्यावधी लोकांना देखील संक्रमित करु शकतात. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतरही ही क्षेत्रे बंद न केल्यास, ते कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणात हॉट स्पॉट बनतील. जर रेड लाईट क्षेत्रे बंद ठेवली तर कोविड -१९ ची प्रकरणे वाढण्यास अटकाव होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment