हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली येथे 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. यानंतर त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. आता या प्रकरणात मुंबई एटीएसनं बॉम्ब स्फोटाचा कट रचणाऱ्या एका आरोपीला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. पकडलेल्या या संशयित दहशतवाद्याचे नाव इमरान उर्फ मुन्नाभाई सांगितलं जात आहे.
यापूर्वी जाकिर हुसेन शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. जाकिरच्या चौकशीनंतर आज अटक केलेल्या संशयिताचे नाव समोर आले. यानंतर मुंब्रा परिसरात महाराष्ट्र एटीएसने छापा टाकला. गुप्तचर एजेंसीच्या अलर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दहशतवादी रेल्वेमध्ये गॅस अटॅक किंवा प्लेटफॉर्म प्रवाशांच्या गर्दीवर त्यांचा निशाणा आहे. गुप्तचरच्या या अलर्टनंतर सीआरपीने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली आहे.
Maharashtra Anti-Terrorism Squad has arrested a suspect from the Mumbra area, to be presented before ATS court today
— ANI (@ANI) September 19, 2021
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला. त्यावेळी ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत जोगेश्वरी येथून एका संशयिताला पकडलं होतं.