अमरावती हत्याकांडातील मास्टरमाईंडला अखेर अटक; CCTV फुटेजच्या आधारे करण्यात आली कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील उमेश कोल्हे (Umesh Kolhe) या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. मृत उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. याच कारणांमुळे कोल्हे यांची हत्या झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये मारेकरी फार्मसिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांचा बाईकवरुन पाठलाग करीत असल्याचे दिसत आहेत.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक
उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांनी काही दिवसांपूर्वी एक फॉरवर्डेड मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केला होता. या मेसेजला उत्तर म्हणून उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची सहा जणांनी मिळून सुऱ्याने गळा चिरून हत्या केली होती. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्यसूत्रधाराला अखेर अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेख इरफान शेख रहीम असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे.

त्या दिवशी काय घडले होते नेमके ?
उमेश कोल्हे (Umesh Kolhe)21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे ‘मेडिकल स्टोर’ बंद करून घरी जात असताना हा प्रकार घडला. त्यावेळी उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होते. यावेळी मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहात होते. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे संकेतने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

हे पण वाचा :
देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय

देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? शिंदे म्हणतात….

शिवसैनिकांनो, मुंबई असो वा ठाणे…; दीपाली सय्यद यांचे भावनिक पत्र

Leave a Comment