Maternity Health Insurance | मातृत्व विमा कसा घ्यायचा? जाणून घ्या विम्याचे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maternity Health Insurance | आजकाल अनेक गोष्टींचा विमा काढला जातो. आपण आत्तापर्यंत हेल्थ विमाबद्दल ऐकले आहे. परंतु तुम्ही कधी प्रसूती विमाबद्दल ऐकले आहे का? आज काल प्रसूतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास 50% हून अधिक महिलांची प्रसूती ही सिजेरियन पद्धतीने केली जाते. त्यामुळे जास्त प्रमाणात खर्च होतो. या सिजेरियनमध्ये 50000 पर्यंत नक्कीच खर्च होतो. त्यामुळे आर्थिक ताण देखील वाढतो. अशावेळी तुम्ही प्रसूतीच्या काळातील विमा (Maternity Health Insurance) काढून तुमचे सगळे पैसे कव्हर करू शकता. आणि तुम्हाला आर्थिक ताण देखील येणार नाही.

मातृत्व विम्याचे कोणते लाभ होतात? | Maternity Health Insurance

  • मातृत्व विमामध्ये प्रसूतीपूर्व प्रसूती आणि प्रसूती नंतरच्या काळातले सगळे खर्च कव्हर केले जातात.
  • त्याचप्रमाणे या विम्यामध्ये प्रसूतीच्या काळात करण्याचे सगळे लसीकरण, इन्फर्टिलिटी बाबतचे उपचार देखील केले जातात.
  • या मातृत्व विम्यामध्ये सरोगसी आणि आयवीएफ उपचारांचा देखील खर्च दिला जातो.

मातृत्व विमा कसा घ्यायचा ?

तुम्ही कोणत्याही कंपनीतून जेव्हा मातृत्व विमा घेता, त्यावेळी त्या पॉलिसीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात. हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
यामध्ये ब्लड टेस्ट, अल्ट्रा साऊंड टेस्ट इत्यादी चाचण्यांचा समावेश असावा. त्याचप्रमाणे प्रसूतीनंतरच्या काळातील बालकाचे सगळे उपचार असले पाहिजे.
त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व लसीकरण त्याचप्रमाणे बाळाचे लसीकरण या गोष्टीचाही त्यात समावेश असणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे बाळाचे आजार आणि उपचार या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून कव्हर होणार आहेत की नाही हे पाहणे देखील गरजेचे आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या रूमचे भाडे, कॅशलेस हॉस्पिटललायझेशन तसेच इतर आजार देखील त्यात आहे का हे जाणून घेणे गरजेचे आहे.
या पॉलिसीची प्रतीक्षा कालावधी किती आहे हे पाहावे. हा कालावधी दोन ते सहा वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही मातृत्व विमा घेऊन तुमची प्रसूती अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकता. कारण यामध्ये तुम्हाला खर्चाचे जास्त टेन्शन राहणार नाही. प्रसूतीपूर्व आणि प्रसूती नंतरचे सगळे खर्च कव्हर केले जातील.