माथेरान-महाबळेश्वरला फिरायला निघालात? तर पहिल्यांदा ही बातमी वाचाच

0
4
Matheran-Mahabaleshwar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूतही उष्णतेची तीव्रता वाढली आहे. (Weather Update) यासह महाराष्ट्रातही उन्हाचा जोर वाढत असून याची झळ विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लागत आहे. इतकेच नव्हे तर, थंड हवेची ठिकाणे असलेली महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि माथेरान (Matheran) येथे देखील उन्हाचा पारा वाढला आहे.

राज्यात सर्वाधिक उष्णता विदर्भात जाणवत असली तरी कोकणातील रत्नागिरीमध्ये तापमानाने उच्चांकी स्तर गाठला आहे. येथे तब्बल 38.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणीही तापमान झपाट्याने वाढत आहे.

आताच्या घडीला माथेरानमध्ये 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर , महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणीही दुपारच्या वेळी तापमान 32 अंशांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी, उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनाही उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तुम्ही जर या दोन्ही ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर तो विचार आताच थांबवा.

तर दुसऱ्या बाजूला, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढली आहे. समुद्रकिनाऱ्यालगत आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरीकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवत आहे. आता येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी चढणार असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

कोकणाला गारपीटीचा तडाखा

दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात उन्हाचा कडाका जाणवत असताना कोकणातील बागायतदारांना गारपीटीचा सामना करावा लागतो आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे आंबा आणि काजू बागायतीचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता गारपीटीचं प्रमाण कमी झालं असलं तरी दमट हवामानामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहे.