मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ अन् 2 कोटी दिले; यशवंत जाधव यांच्या डायरीत उल्लेख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या आयकर विभागाच्या रडारावर असलेले शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तपासात जाधवांची येक डायरी आयकर विभागाला सापडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीत मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे. त्यासोबतच यशवंत जाधव यांनी गुढी पाडव्यास ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपये प्रदान केल्याची नोंद आयटी खात्यास जाधवांच्या डायरीत सापडली आहे

मुंबई महापालिका आयुक्त यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये कोट्यवधीच्या व्यवहाराच्या नोंदी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यांत मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकरच्या सूत्रांनी दिली आहे. तसंच मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ दिल्याचाही डायरीत उल्लेख आहे. आता आयकर विभागाकडून या संदर्भात तपास सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, मातोश्री म्हणजे आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

Leave a Comment