खाऊगल्ली | उन्हाळा सुरु झाल्याने तहान लागणे साहजिकच आहे. त्यासाठी उन्हाळ्यात थंडगार मठ्ठा उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच दुपारच्या जेवणात दही,ताक यासारखे पेय पिणे आरोग्यास हितकारक असते.
साहित्य –
१) ३ ग्लास ताक
२) किसलेले आल
३) १ चिमूट बारीक चिरलेली हिरवी मिरची
४) १/२ चमचा जिरे पूड
५) १/२ चमचा काळ मीठ
६) १/२ साखर
७) बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
एका बाऊलमध्ये ताक घेऊन त्यात किसलेले आल्याचा रस गाळणीने गाळून घालावा.
ताकात बारीक चिरलेली मिरची, जिरे पूड,काळ मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे थंडगार मठ्ठा. ताक थंड नसल्यास यात बर्फाचे तुकडे टाकू शकता.
( टीप – ताक नसल्यास दह्यात योग्य प्रमाणात पाणी मिसळून त्याचा मठ्ठा करू शकता. )