कन्नड तालुक्यात गादी घर दुकान आगीत जळून खाक

औरंगाबाद | कन्नड तालुक्यातील गादी घराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आगीचे भयानक स्वरूप पाहता परिसरात धुराचे लोण पसरल्याचे पाहायला मिळाले. आगीत नेमके किती नुकसान झाले आणि आग कशामुळे लागली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

या आगीत गादी घर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात शेजारी असणाऱ्या घरांची संख्या जास्त असल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले.

शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण गेल्या दोन- तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकतीच काल भर रस्त्यात अॅब्म्युलन्सला आग लागल्याची घटना ताजी असताना लागलेल्या आगीने चिंता व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like