हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिरूर अन अहिल्यानगरच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी गावात एका विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह असा होता कि , त्याची ओळख पटवणे अशक्य झाले होते, कारण या मृतदेहाचे शीर, हात, पाय , डोके वेगवेगळे केले होते. ज्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले. पण आता या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळाले असून , या हत्येमागचे कारण समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले आहे. तर चला हे नेमकं प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओळखीच्या समलैंगिक जोडप्याने केली हत्या –
पोलिसांनी तपास करत असताना समोर आले की, माऊली गव्हाणे (19 वर्ष ) याचा खून त्याच्याच ओळखीच्या समलैंगिक जोडप्याने केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मुख्य आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यामध्ये समलैंगिक संबंध होते, आणि माऊली गव्हाणे याला या संबंधांचा माहिती मिळाल्यानंतर दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला होता.
मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय –
6 मार्च रोजी, माऊली गव्हाणे याला आरोपींनी चर्चा करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी बोलवून घेतले . अन त्याच रात्री 11:30 वाजता, माऊली गव्हाणेला गळा दाबून मारून टाकले. त्यानंतर, त्यांनी मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला आणि इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने हात, पाय, धड अन डोक वेगवेगळे केले. मृतदेहाचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले, आणि शीर, एक पाय व दोन हात नदीच्या काठावर असलेल्या विहिरीमध्ये टाकण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेले होते.
पोलिस तपास –
मृतदेहाच्या तुकड्यांमुळे त्याची ओळख पटवणं कठीण होतं. पण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेमुळे, गुप्त माहितीदारांची मदत घेत तपासाला गती मिळाली. काही दिवसांतच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले अन या धक्कादायक , अमानुष हत्येचं पितळ उलगडले.