Tuesday, March 21, 2023

मौनी रॉयने ऐश्वर्याच्या स्टाईलमध्ये केला डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मादक फोटो, व्हिडीओज, ट्विट्स, ऑनलाईन ब्लॉग्स यांच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. यावेळी मौनी एका डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिने अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या शैलीत केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘तालसे ताल मिला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं ‘ताल’ चित्रपटातील आहे. चित्रपटात या गाण्यावर ऐश्वर्या रायने डान्स केला होता. तिच्याच स्टाईलमध्ये मौनी डान्स करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत दोन लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तसेच हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

ताल’ हा ऐश्वर्या रायच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातील ‘ताल से ताल मिला’ हे गाणं तुफान गाजलं होतं. ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांनी या गाण्याची निर्मिती केली होती. या गाण्याला त्यावेळी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. याच सुपरहिट गाण्यावर मैनीला डान्स करताना पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.