Mayank Agarwal Hospitalized : मयंक अग्रवालवर विषप्रयोग?? तातडीने ICU मध्ये भरती

Mayank Agarwal Hospitalized
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mayank Agarwal Hospitalized । क्रिकेटपटू मयंक अग्रवालची तब्ब्येत अचानक बिघडली आहे. मयंकला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोंडात आणि घशात जळजळ होत असल्याची तक्रार मयंकने केली आहे. बाटलीबंद पाणी प्यायल्यानंतर घशात जळजळ झाल्याचे मयंकने सांगितलं आहे त्यामुळे त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलीस तक्रारही करण्यात आली आहे. सध्या मयंकची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे.

मयंकला नेमकं काय झालं? Mayank Agarwal Hospitalized

याबाबत अधिक माहिती अशी कि, त्रिपुरा विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा संघ पुढील सामन्यासाठी दिल्ली मार्गे सुरतला रवाना झाला. कर्नाटकचे सर्व खेळाडू विमानात सुद्धा बसले होते, त्याचवेळी मयंकची तब्ब्येत अचानक बिघडली आणि त्याच्या घशात जळजळ व्हायला लागली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्याला रुग्णालयात दाखल (Mayank Agarwal Hospitalized) करण्यात आलं. पीटीआयच्या वृत्तानुसार विमानात बसल्यानंतर मयंकने एका पाऊच मधून काहीतरी द्रव पदार्थ प्यायला होता. त्यामुळे त्या लिक्विड मध्ये काही प्रमाणात भेसळ झाल्याचा संशय आहे.

दरम्यान, रणजी ट्रॉफी स्पर्धेत मयंक कर्नाटकचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने पहिल्याच सामन्यात पंजाबचा सात गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर गुजरातविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. गोव्यासोबतचा सामना अनिर्णित राहिला. तर त्रिपुराचा 29 धावांनी पराभव केला. आता कर्नाटकचा पुढचा सामना २ फेब्रुवारीपासून सुरतमध्ये रेल्वेविरुद्ध होणार आहे. मयंकची या रणजी स्पर्धेत संमिश्र कामगिरी राहिली आहे. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला दोन्ही डावात भोपळाही फोडता आला नाही, त्यानंतर गुजरातविरुद्व मात्र त्याने पहिल्या डावात 109 धावांची शतकी खेळी केली. गोव्याविरुद्ध सुद्धा त्याने 114 धावा केल्या तर त्रिपुराविरुद्ध ५१ आणि १७ धावा ठोकल्या.