दिल्ली वृत्तसंस्था :
बहुजन समाज पार्टी च्या सर्वेसर्वा मायावती या निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. येत्या निवडणुकीत मी माझा उमेदवार अर्ज भरणार नाही निवडणुकीनंतर वाटल्यास कोणत्याही एका जागेवर मी निवडणूक लढवून लोकसभेत जाऊ शकते परंतु आता सध्या याबाबत असा काही विचार नाही असं त्यांनी या वेळी स्पष्ठ केलं.
या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस आघाडीवर टीका देखील केली त्या म्हणाल्या उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस सोबत आम्ही कोणतीही समझौता केलेला नाही.आम्ही उत्तर प्रदेश मध्ये सपा बसपा चं सरकार आणण्यास समर्थ आहोत तसेच काँग्रेसने याबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सपा बसपा आणि रालोआ आघाडी झाली आहे.
काँग्रेस वारंवार आम्ही सपा बसपा आघाडी शी समझौता केला आहे असा दावा करून संभ्रम निर्माण करत आहे. यावर मायावतींनी भडकून आज ट्विट केलं आणि काँग्रेसला खडेबोल सुनावले.
मायावती यांनी २०१७ मध्ये उना प्रकरणात प्रश्न मांडायला दिले नाही या कारणाने लोकसभेमध्ये राजीनामा दिला होता ,त्यावेळी देशभरात मोठा गदारोळ झाला होता. निवडणुकीनंतर पून्हा लोकसभेत मायावती जाऊ इच्छितात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.