Mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी!! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलावर्ग अर्ज करत आहेत, मात्र अर्ज करताना महिलांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी महायुती सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती असे या दोन्ही समित्यांची नावे आहेत. या समित्या अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.

महिलांच्या खात्यावर कधी पैसे जमा होणार?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेनुसार, दर महिन्याला १५०० रुपये महिलांना मिळणार आहेत. येत्या १९ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या शुभमुहूर्ती जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे मिळून प्रत्येकी ३००० रुपये राज्यभरातील महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mazi Ladki Bahin Yojana) घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र सरकारने अनेक अटी आणि शर्थी काढून टाकल्यानंतर आता अर्ज प्रक्रिया सोप्पी झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय?

२१ ते ६५ वय वर्ष असलेल्या महिलांना अर्ज करता येईल
सदर महिला महाराष्ट्र रहिवासी असावी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा कमी असावं

आवश्यक कागदपत्रे – Mazi Ladki Bahin Yojana

आधारकार्ड
रेशनकार्ड
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र