पेरू विकून MBA पास तरुणाने कमवले 1 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तम प्रकारची शेती करायची असेल आणि त्यातून चांगले उत्पन्न काढायचे असेल तर अनुभव आणि उत्तम ज्ञान असावे लागते. हे MBA शिक्षण घेतलेल्या नैनिताल येथील राजीव भास्कर या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून 25 एकर क्षेत्रात पेरूची शेती करून त्यातून उत्तम उत्पन्न घेत स्वतःच विक्री करून तब्बल 1 कोटी रुपये कमवले आहे.

शेतकरी मित्रानो, फलोत्पादनास कोणती जमीन, हंगाम योग्य आहे, पिकावरील कीड व रोगाचे नियोजन कसे करावेत, कोणत्या फळास जास्त मागणी आहे, तुम्हालाही कोणत्या फळाची किंवा रोपांची लागवड करायची असेल आणि रोपे खरेदी करायची असतील तर चिंता करू नका. हॅलो कृषी हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या आसपास असलेल्या रोपवाटिका मालकांशी थेट आणि अगदी कमी वेळेत संपर्क साधा.

guava

त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड आणि Install करा. Hello Krushi ओपन करताच तुम्हाला त्यामध्ये रोपवाटिका, खत दुकाने आणि कृषी केंद्र हा पर्याय दिसेल. यावर क्लीक करताच तुम्हाला तुमच्या आसपारन असलेल्या खत दुकानदार आणि रोपवाटिकांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिसतील. याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सर्व मालाचे बाजारभाव, सातबारा उतारा, जमीन मोजणी अशा सुविधा मिळतात. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकता.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

Guava Tree

नोकरी सोडून घेतला शेती करण्याचा निर्णय

नैनितालमध्ये जन्मलेल्या राजीव भास्कर यांनी रायपूरमधील बियाणे कंपनीत काम करताना मिळवलेले कौशल्य एक दिवस त्यांना समृद्ध शेतकरी आणि उद्योजक बनण्यास मदत करेल याची कल्पनाही केली नव्हती. व्हीएनआर सीड्स कंपनीच्या विक्री आणि विपणन संघाचा सदस्य म्हणून जवळपास चार वर्षे त्यांनी काम केले. यावेळी देशातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांशी त्यांना संवाद साधण्याची संधी मिळाली. या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर शेतीची माहिती मिळाली. यानंतर त्यांनाही नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.

थाई प्रकारातील पेरू

अशी केली शेती करण्यास सुरुवात

कृषी विषयात बीएस्सी झाले असले तरी व्हीएनआर सीड्समध्ये काम करण्यास सुरुवात करेपर्यंत राजीव यांना सुरुवातीला शेतीत करिअर म्हणून करण्याची इच्छा नव्हती. या दरम्यान त्यांनी बाह्य शिक्षणातून एमबीए पूर्ण केले होते. पण जसजशी त्यांनी बियाणे आणि रोपे विक्री करण्यास सुरुवात केली, तसतशी त्यांच्यात शेतीतील आवड वाढत गेली आणि शेवटी त्यांना थाई प्रकारातील पेरूचीही माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शेती सुरू केली.

थाई प्रकारातील पेरू

25 एकरवर थाई पेरूची लागवड

राजीव यांनी हरियाणातील पंचकुला येथे पेरूची शेती सुरू केली. त्यासाठी त्यांनी 5 एकर जमीन भाड्याने घेतली आणि नोकरी सोडून थाई पेरूची लागवड केली. काही वेळातच राजीवच्या शेतात पिकवलेल्या पेरूची मागणी संपूर्ण हरियाणामध्ये वाढू लागली. यामुळेच त्यांनी अवघ्या 5 वर्षांत कोट्यवधी रुपयांची कमाई केली. मात्र, 5 वर्षांत त्यांच्या लागवडीखालील क्षेत्रही वाढले. आता ते 25 एकरात थाई पेरूची लागवड करत आहेत.

थाई प्रकारातील पेरू

1 एकरातून 6 लाख रुपयांपर्यंत कमाई

शेती सुरू केल्यानंतर राजीव यांनी 017 च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पहिले पीक घेतले आणि पेरू विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2019 मध्ये पंजाबच्या रुपनगर येथे त्यांनी 55 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आणि 25 एकरमध्ये पेरूची झाडे लावली. तोपर्यंत पंचकुला प्लांटेशनमध्ये 5 एकर जमिनीवर काम करत राहिले. पण 2021 मध्ये पंचकुलातील जमीन सोडली आणि त्यांनी संपूर्ण लक्ष रूपनगरकडे शेतीकडे दिले. पेरू काढल्यानंतर 10 किलोच्या क्रेटमध्ये दिल्ली एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचवेळा जातो. त्याठिकाणी पेरू दिल्यानंतर एका आठवड्यात पैसे मिळतात. हंगाम आणि गुणवत्तेनुसार प्रति किलोची किंमत 40 ते 100 रुपयांपर्यंत असते. अशाप्रकारे एकरी सरासरी 6 लाख रुपये इटकर पैसे मिळतात.

थाई प्रकारातील पेरू

अशा प्रकारे मिळतो नफा

राजीव यांच्या शेतात सुमारे 12 हजार पेरूची झाडे आहेत. एकरी सरासरी सहा लाख रुपये नफा मिळतो. अशाप्रकारे त्यांना एका वर्षात 25 एकर जमिनीतून दीड कोटी रुपयांची कमाई होत आहे. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा शेतीला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अशा फळांच्या शेतीच्या विकासासाठी खतांच्या वापरासोबतच पुरेसे सिंचन आवश्यक आहे. याशिवाय शेतातील पेरू चविष्ट तसेच पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर व्हावेत म्हणून सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पादन मिळते. मग त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.