लॉकडाऊनमुळे राज्यात MCA CET 2020 प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेलं लॉकडाउन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानं अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा कधी होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कोरोनामुळं संपूर्ण प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक कोलमडल आहे. याच थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे.

अशा संभ्रमाच्या परिस्थितीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा (एमएच एमसीए-सीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. सद्य स्थितीची समिक्षा करण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

यापूर्वी सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात १३ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सीईटी होणार होती. परंतु लॉकडाउनचा कालावधी वाढवल्यानं ती परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा कक्षानेही ५ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान होणारी जेईई पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment