Tuesday, June 6, 2023

देशभरात 30 नवीन आउटलेट्स उघडण्याची तयारी करत आहे McDonald’s ! 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली । एकीकडे लॉकडाउन आणि कोरोना संकटा दरम्यान सगळीकडून निराशाजनक बातम्या येत आहेत, अशातच एक चांगली बातमी देखील आली आहे. McDonalds restaurants चेन ऑपरेट करणारी वेस्टलाइफ डेव्हलपमेंट (Westlife Development) या आर्थिक वर्षात देशभरात 30 नवीन आउटलेट्स (outlets) उघडणार आहे. यासाठी कंपनी 100 कोटींची गुंतवणूक करेल. देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भारतात कंपनीची चांगली पोहोच आहे. कोरोना कालावधीतही कंपनीच्या विक्रीतील takeaways चा वाटा जवळपास 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पुढील वाढीच्या संभाव्यतेबद्दल कंपनी खूप उत्सुक आहे. ते म्हणतात की,” आपण पुढचे 2-3 महिने वगळल्यास आर्थिक वर्ष 2022 मध्ये तुम्हाला चांगली वाढ दिसेल.

वेस्टलाइफ डेव्हलपमेंटचे उपाध्यक्ष अमित जटिया म्हणाले की,” या आर्थिक वर्षात 20-30 नवीन मॅकडोनाल्डची आउटलेट्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. ज्यामध्ये 100 कोटींची गुंतवणूक केली जाईल. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 5 नवीन मॅकडोनाल्डचे आउटलेट्स देखील उघडले.

कोविड-19 मुळे ‘या’ मार्गाने खरेदी होत आहे
जटिया या संभाषणात पुढे असेही म्हणाले की, कोविड-19 मुळे ग्राहक टेकवे आणि ड्राईव्ह थ्रू या मार्गाने खरेदी करीत आहेत. चालू आर्थिक वर्षात होणाऱ्या वृद्धीबद्दल कंपनी चांगलीच उत्साही आहे. कोरोना काळातील खरेदीचा बदलता मार्ग पाहता कंपनीने आपले डिजिटल चॅनेल मोठ्या प्रमाणात बळकट केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान डिजिटल प्लॅटफॉर्मला बरीच मजबूत केली गेली आहे. मागील वर्षी दिसलेल्या डिजिटल सुविधांचा फायदा घेत ग्राहक खूपच चांगले ऑर्डर घेत आहेत.

वार्षिक उत्पन्न 6.31 टक्क्यांनी वाढून 357.58 कोटी रुपये झाले
2020-21च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या 55-60 टक्के विक्री convenience channels म्हणजेच डिलिव्हरी, टेकवे आणि ड्राईव्ह थ्रुद्वारे झाल्या आहेत. तर 40-45 टक्के विक्री स्टोअर व्यवसायाद्वारे झाली आहे. याचा अर्थ असा की लोकांनी आउटलेटमध्ये खाल्ले. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत Westlife Development ची तूट वार्षिक आधारावर कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ती 25.26 कोटी रुपयांवरुन 6.45 कोटी रुपयांवर आली आहे. याच काळात कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 6.31 टक्क्यांनी वाढून 357.58 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत ती 336.35 कोटी रुपये होती.

42 शहरांमध्ये 305 मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्ट्स
सध्या वेस्टलाइफ डेव्हलपमेंटची शाखा Hardcastle Restaurants तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गोवा आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील 42 शहरांमध्ये 305 मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्स चालविते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group