एमडीएच चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमडीएच मसाल्याच्या ब्रँडचे मालक, ‘महाशय’ धरमपाल गुलाटी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. वृत्तानुसार, गेल्या तीन आठवड्यांपासून गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. सकाळी 5:38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पण नंतर ते बरे झाले. गेल्या वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

महाशय धर्मपाल गुलाटी MDH चे मालक होते. अनेकदा त्यांचे फोटो आपण MDHच्या मसाल्यांचा पाकिटावरही पाहिले असतील. त्यांच्या वडिलांनी सध्याचं पाकिस्तान पण त्या काळात असलेलं सियालकोट इथे 1919 साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता.

सुरुवातील त्यांनी कुटुंब चालवण्यासाठी टांगाचालक म्हणून देखील काम केलं होतं. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला.

गुलाटीची कंपनी ब्रिटन, युरोप, युएई, कॅनडा इत्यादी जगाच्या विविध भागात भारतीय मसाल्यांची निर्यात करते. 2019 मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला. एमडीएच मसालाच्या म्हणण्यानुसार धरमपाल गुलाटी यांनी आपल्या पगाराच्या जवळपास 90 टक्के रक्कम दान केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment