खतरा! विनाकारण बाहेर फिरत असाल तर…’या’ नगरपरिषदेने ‘असा’ रंगवलाय रस्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेढा प्रतिनिधी | कोरोनो संसर्गजन्य रोगाचा विळखा दिवसें दिवस वाढत असुन प्रशासनाकडून या रोगाचा वाढता विळखा रोकण्याकरीता देशभर लाॅकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र संचारबंदी असुन देखील काही लोक रस्त्यावर फिरत असतात. पोलीसाकडुन याबाबत कारवाई केली जाते. मात्र मेढा नगरपंचायत कडून मेंढ्यातील मुख्य चैाकात रस्त्यावर मोठ्या अक्षरात “ खरच आपण कामासाठी बाहेर पडला आहात का विनाकारण फिरत असाल तर कुटुबाला व शहराला धोक्यात आणत आहात” असा संदेश मेढ्याच्या मुख्य चैाकात रस्त्यावर पांढर्‍या मोठ्या अक्षरात लिहीला आहे.

विनाकारण बाहेर फिरणार्‍यांना शहाणपण यावं, त्यांनी घरात सुरक्षित थांबुन शहराला तसेच कुटुबंला सुरक्षित ठेवाव असा बहुमुल्य संदेश देण्याचा प्रयत्न मेढा नगरपंचायत कडुन करण्यात आला आहे. मेढा नगरपंचायतच्या या लिहीलेल्या ब्रीदवाक्याचा उपयोग विनाकरण फिरणार्‍यांवर काय होतोय हे येणारा काळ ठरवेल. मात्र पोलिसांना त्यांचे काम करताना यापुढे सोयीच होणार आहे हे मात्र नक्की.

मेंढ्यांमध्ये पोलिसांनी विनाकारण फिरणार्यानविरोधात संचार बंदी अधिक सक्त जरी केली असली तरि मेढा परीसरात मुंबईचे बाबु येवुन मेंढ्यांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र पहायला मिळत अाहे. मेढा नगरपंचायतने यावर उपाय म्हणुन पुढील चार दिवस जनता कर्फ्यु जास्त कडक करणार असुन मेंढ्यातून सर्व व्यापारांनी आपली दुकाने बंद करण्याचे अावाहन देखील मेढा नगरपंचायत कडुन करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कराडचा दोन दिवसांचा जनता कर्फ्यू सीओंवरच उलटला

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Leave a Comment