औरंगाबाद । दवाखान्यात जाण्याची सोय उपलब्ध नसल्याने आजारपण लोक अंगावर काढतात. लहान बालके आणि महिलामध्य कुपोषण होत असले तरी दवाखाने दूर दळणवळणाची साधने कमी त्यामुळे उपचार टाळण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र मेडिकल मोबाईल व्हॅनमुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना आजारपण अंगावर काढण्याची वेळ येणार नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून एक जूनपासून ही मेडिकल मोबाईल व्हॅन दुर्गम भागात आरोग्य सेवा देणार असून गर्भवती महिला आणि नवजात बालकांना आरोग्याविषयी सुविधांबरोबरच सामान्य बाह्यरुगण विभागात उपलब्ध असलेल्या उपचार आणि औषधै याविषयीची माहिती आली. या मोबाईल व्हॅनमध्ये विविध आरोग्य तपासणी करण्याची सोय आहे.
यामुळे ग्रामीण भागातील आजारी रुग्णांना या व्हॅनमध्येच रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, फुफ्फुसाचे आजार, मूत्रविकार, एचआयव्ही व रक्ताविषयीच्या तपासण्या या ठिकाणी उपलब्ध आहे. वैजापूर तालुक्यातील अलापुरवाडी, नारळा, खारज, तलवडा, टुनकी ,भावली, मानली, रघुनाथपुरवाडीशाफियाबादवाडी, हाजीपुरवाडी, कोरडगाव, पिंपळगाव खंडाळा,जिरी,वांजरगाव, म्हास्की,वीरगाव,बाभुळगाव गंगा, पानवी खंडाळा,भिवगाव वैजापूर बिलोली़. अशा ५५ गावात मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे.