पाटण | पाटण तालुका हा दुर्गम भाग असा असलेला असून तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे. या दवाखान्यात दररोज शेकडो रूग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. या सरकारी दवाखान्याला प्रशस्त जागा असून साहित्य, बिल्डिंगही सुसज्ज अशी आहे. मात्र, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील पाटण शहरातील ग्रामीण रूग्णालयाला वैद्यकीय अधीक्षकाविना सलाईनवर आहे.
पाटण ग्रामीण रूग्णालयात सर्व सोयीनी असा आहे. मात्र, येथील व्यवस्था कशी व्यवस्थित राहील याकडे कोणत्याच राजकीय नेत्याचे लक्ष नाही. पाटण ग्रामीण रूग्णालयात सध्या प्रभारी पद कराड येथील डाॅ. दिपक कुऱ्हाडे यांच्यावर आहे. प्रभारी असलेले डाॅ. कुऱ्हाडे हे कराडवरून ये- जा करत असतात. कोरोना सारख्या महामारीच्या काळातही अधीक्षक पद रिक्त होते. स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील डाॅ. कुऱ्हाडे यांच्यावर जबाबदारी आहे. परंतु कायमस्वरूपी पाटण ग्रामीण रूग्णालयाला अधीक्षक मिळणार का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. मुक्कामी पाटण शहरात वैद्यकीय अधीक्षक मिळावा, अशी आशा पाटण वासियांच्यातून व्यक्त होत आहे.
पाटण शहरात ग्रामीण रूग्णालयात अनेक सोयी- सुविधा आहेत. परंतु येथील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासह नियोजन कुणी करायचा असा प्रश्न आहे. डोंगर दऱ्यातील सामान्य माणूस या रूग्णालयात उपचारासाठी येत आहे. परंतु जिथे वैद्यकीय अधीक्षक हे पदच रिक्त असल्याने वस्तू स्वरूपातील सोयी- सुविधाचा वापर कोणी करायचा. तसेच अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांना वाली कोण असा प्रश्न आहे.