Medicine Price | सरकारने घेतला मोठा निर्णय; जवळपास 70 औषधांच्या किमती होणार कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Medicine Price | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे औषधोपचारांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. परंतु आता या सगळ्यांमध्ये सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. ते म्हणजे आता अनेक औषधांच्या किमती कमी होणार आहेत. पेन किलर त्याचप्रमाणे एंटीबायोटिक्स यांच्या सहज जवळपास 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना अगदी स्वस्तामध्ये त्यांच्या आजारांवर उपचार होणार आहे.

नॅशनल फार्मासिटिकल प्राइज इन अथोरिटीने नुकत्याच झालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशात विकल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीमध्ये आता नियंत्रित करणे, आणि त्याचा वापर सामान्य लोकांमध्ये करून देणे हा उद्देश आहे. या बैठकीत जवळपास 70 औषधे आणि चार विशेष औषधांच्या किमती (Medicine Price) कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

दोन महिने पूर्वी म्हणजे जून महिन्यातच सरकारने अनेक आवश्यक औषधाच्या किमती (Medicine Price) कमी केल्या होत्या. परंतु आता एनपीपीएच्या 124 बैठकीत सामान्यना वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या आणि 8 विशेष औषधांच्या किमती देखील कमी केलेल्या आहेत. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टी विटामिन, मधुमे, हृदयाशी संबंधित असणाऱ्या अनेक औषधांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे कॅन्सरच्या आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषध देखील स्वस्त करण्यात आलेली आहेत.

सर्वसामान्यांना होणार फायदा | Medicine Price

अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी झाल्याने देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. अनेक गरीब लोकांना औषध उपचाराचा खर्च जास्त असल्याने आजारांवर उपचार घेता येत नाही. परंतु आता हे औषधे अगदी कमी दरात मिळाल्याने सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे.