परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी ते परळी रेल्वे प्रवासादरम्यान पोखर्णी स्थानकावर रेल्वे पटरीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याने आदिलाबाद-परळी आणि अकोला-परळी या दोन्ही पॅसेंजर गाड्या २२ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या आता परभणीपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
परभणी ते परळी सेक्शन मधील गंगाखेड ते पोखर्णी (नृसिंह) रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे पटरीच्या दुरुस्ती करीता सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ दरम्यान रोज चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान ७७ दिवसांचा असेल. याचा परिणाम आदिलाबाद ते परळी आणि परळी ते अकोला या दोन गाड्यांवर होणार आहे.
त्यामुळं आदिलाबाद ते परळी ही सवारी गाडी परभणीपर्यंतच धावेल. ही गाडी परभणी ते परळी ६ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीसाठी रद्द असेल. तसेच परळी ते अकोला ही गाडी ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान परळी ते परभणी दरम्यान रद्द असेल. तसेच गाडी या तारखेस परभणी ते अकोला अशी धावेल. तर परतीच्या प्रवासात परळी ऐवजी परभणी येथून सुटेल.दरम्यान प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.