Mega Block Update| मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे हा मेगा ब्लॉक घेतला जात आहे. परिणामी अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही फेऱ्यांना विलंब होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
मेगा ब्लॉकचा कालावधी (Mega Block Update)
रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.०० दरम्यान, अप आणि डाउन धीमा मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक राहणार आहे. यामुळे धीम्या मार्गारील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर काही फेऱ्या रद्द केल्या जातील. उद्या अप आणि डाउन मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान देखील सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना वाहतुकीसाठी दुसरा पर्याय निवडावा लागेल.
दरम्यान, मध्यंतरी मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. काही तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली होती. या काळातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. परिणाम या मेगाब्लॉकमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तर लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक गैरसोयीचा सामना करावा लागला होता.