नवी दिल्ली वृत्तसंस्था: प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल घोटाळाप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी मेहुल चोक्सीला अखेर मंगळवारी डोमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकार कडून मेहुल चोकसीला भारतात सोपवणार असं सांगितलं होतं आता मात्र डोमिनिका सरकारने आपला हा निर्णय बदलला आहे. मेहुल चोकसीला पुन्हा डोमिनिका सरकार अँटिग्वाकडे सोपवणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
भारतात प्रत्यारोपणाच्या बाबतीत बोलताना मेहूल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, ” मेहुल चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे. तर भारतीय नागरिकत्व सोडले आहे. इमिग्रेशन आणि पासपोर्ट ॲक्टनुसार चोकसीला अँटिग्वाला परत पाठवता येऊ शकते. मेहुल चौकशीला डोमिनिका देशातून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी अटक झाली होती त्याला आता परत अँटिक वाकडे पाठवण्यात येणार असल्याचं डोमिनिकाच्या मिनिस्ट्री ऑफ नॅशनल सिक्युरिटी अँड होम अफेअर्सने म्हंटले आहे.
चोक्सीच्या शरीरावर खुणा
मेहुल चोक्सीला जबरदस्तीने डोमिनिका इथं देण्यात आल्याचे त्याच्या वकिलांनी म्हटले आहे. तसंच त्याच्या शरीरावर काही खुणा आहेत. असा दावाही त्यांच्या वकीलांनी गुरुवारी केलाय. विजय अग्रवाल यांच्या दाव्यानुसार गीतांजली समूहाच्या अध्यक्षाना काही लोकांनी जबरदस्ती घेऊन गेले. त्यांना अँटिग्वा इथून जहाजातून डॉमिनिका येथे नेण्यात आलं. अगरवाल यांनी आरोप केला आहे की चोक्सीच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणा आहेत. डोमिनिका येथील चोक्सीचे वकील बिन मार्शल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी शरीरावर असलेल्या खुणांची स्पष्टता केली. चोक्सीचे डोळे सुजलेले आहेत आणि शरीरावर काही खुणा असल्याचं दिसल्याचं मार्शल यांनी सांगितले आहे.