औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीने संपूर्ण राज्यभर इमान घातलेले आहे. कोरोना महामारीमुळे शहरातील नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये देखील बेडची कमी भासत होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसरी लाट ऑगस्टच्या अखेरीस येणार आहे. यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाय योजना करत आहे. आता मेल्ट्रोनमध्ये गरजेपेक्षा तिप्पट ऑक्सीजन मिळत आहे. या ठिकाणी दररोज 290 जम्बो सिलेंडरची निर्मिती करण्यात येत आहे.
महापालिकेच्या मेल्ट्रोन कंपनीतील कोविड सेंटर साठी तीन प्लांटद्वारे ऑक्सीजन मिळणार आहे. याठिकाणी हवेतला ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांट द्वारे सुमारे 290 जेम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी वीस किलोमीटर लिक्विड ऑक्सिजन ची व्यवस्था देखील केली आहे. मेल्ट्रोन कोविड हॉस्पिटलमधील 300 बेडला ऑक्सिजन सुविधा देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून लिक्विड ऑक्सीजन प्लांट देखील मंजूर करण्यात आला. परंतु आर्थिक संकटांमुळे हवेतला ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्पाचा पर्याय समोर येताच लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट रद्द करण्यात आला.
पर्यटन मंत्री आज आदित्य ठाकरे यांनी सीएसआर फंडातून औरंगाबाद साठी दोन ऑक्सीजन प्लांट मंजूर केले होते. यातील एक प्लांट सुरू झाला असून दररोज 40 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कार्यालयातर्फे मंजूर करण्यात आलेल्या प्लांटची क्षमता रोज 250 जम्बो सिलेंडर एवढी आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होणार असून दररोज 20 किलो लिटर लिक्विड ऑक्सिजन मिळणार आहे. यानंतर 300 बेड साठी फक्त 70 ते 80 जम्बो सिलेंडरची आवश्यकता भासू शकते.