Menopause Symptoms | प्रत्येक महिलेच्या जीवनामध्ये मासिक पाळी येणे, हे अत्यंत स्वास्थ आरोग्याचे लक्षण मानले जाते. परंतु एका ठराविक काळानंतर ही मासिक पाळी येणे बंद होते. त्याला मेनोपॉज असे म्हणतात. यानंतर महिलेच्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडत असतात. परंतु मेनोपॉज येण्याआधी काही लक्षणे दिसू लागतात. जसे की प्रत्येक महिन्याला येणारी तुमची मासिक पाळी ही अनियमित होते. ती काही वेळा येते तर काही वेळा येत नाही. आता हा मेनोपॉज (Menopause Symptoms) चालू झाल्यावर शरीरात नक्की कोणती लक्षणे दिसतात हे आपण जाणून घेणार आहोत. .
मेनोपॉजबद्दल (Menopause Symptoms) स्त्री रोगतज्ञ यांनी सांगितले की, या काळामध्ये महिलांमध्ये हार्मोन्सची पातळी कमी होते. यावेळी स्त्रियांमधील प्रजननाची प्रक्रिया देखील बंद होते. परंतु महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. या मेनोपॉजचे तीन टप्पे आहे. ते म्हणजे प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज. साधारण 45 ते 55 असणाऱ्या महिलांमध्ये मेनोपॉज सुरू होतो. परंतु आजकाल महिलांची जीवनशैली देखील खूप बदलली आहे. आणि वैद्यकीय ट्रीटमेंट देखील अनेकांच्या चालू आहे. त्यामुळे हा टप्पा काही महिलांमध्ये खूपच लवकर चालू होतो. आता आपण मेनोपॉज चालू होताना कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
हॉट फ्लॅश | Menopause Symptoms
यामध्ये व्यक्तीला जास्त घाम येतो. तसेच अस्वस्थ वाटते. हे हॉट फ्लॅश काही मिनिटे किंवा तास देखील होते. यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात डोकेदुखी चालू होते.
अनियमित मासिक पाळी
मेनोपॉज चालू झाल्यावर महिलांच्या मासिक पाळी अनियमितता येते. महिलांमध्ये अनेक शारीरिक बदल होतात हार्मोनल देखील बदलतात. मासिक पाळी हे नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त काळ देखील येते. तसेच रक्तप्रवाह देखील कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो.
रात्रीचा घाम येणे
अनेकवेळा महिलांचा मेनोपॉज सुरू झाला की, रात्रीचा घाम येतो. काही वेळा व्यक्ती पूर्णपणे घामाने देखील भिजलेली असते. यावेळी झोप देखील येत नाही. तसेच त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये देखील खूप जास्त बदल होत असतो.
मूड स्विंग्स | Menopause Symptoms
मेनोपॉज चालू झाल्यावर मूड्स स्विंग्स मोठ्या प्रमाणात जाणवते. अशा वेळी महिलांना कोणत्याही क्षणी आनंद वाटतो. तर दुसऱ्या क्षणी लगेच दुःख देखील वाटू शकते. याचा तुमच्या वैयक्तिक नात्यांवर आणि दैनंदिन जीवनावर देखील नकारात्मक परिणाम होतो.जर ही सगळी लक्षणे असतील तर तुम्ही मेनोपॉजला सामोरे जाण्यासाठी तयार व्हायला पाहिजे.