हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे वतीने 25 फेब्रुवारी रोजी जिंतूर शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे 160 किशोरवयीन मुलीसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला मुख्याध्यापिका शिक्षिका श्रीमती रेवता राऊत, श्रीमती एस एस पाटील, श्रीमती के जी अंभोरे, श्रीमती एस के कोकणे, श्रीमती एस ए बेग, श्रीमती जे एस लोखंडे, श्रीमती एस .आर . पाईकराव, शिक्षक शहेजाद खान, घुगे , शिंदे , सावळे , बाळू बुधवंत यावेळी 160 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉ .सौ . आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस तसेच शाश्वत पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.
या समुपदेशन सत्रात 160 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले. शेवटी तितक्याच मुलींची 20 प्रश्नांची स्वयंअध्ययन चाचणी घेण्यात आली.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर व जिल्हा परिषद शाळा पांगरी येथील मुलींसाठी ‘मेन्स्ट्रुपेडिया’ या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. “येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ” संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.
कोणतेही शासकीय मदत किंवा मानधन न घेता समुपदेशन करणारी टीम: एचएआरसी संस्थेतील टीम सदस्य डॉ आशा चांडक या मासिक पाळी समुपदेशन उपक्रमात स्वतःच्या व्यस्त नियोजन सांभाळून शासनाकडून किंवा संबंधित संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च न घेता काम करत आहे. एचएआरसी संस्था सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून लोकसहभागातून मागील 2019 पासून संपूर्ण जिल्ह्यात मासिक पाळी समुपदेशन चे कार्य करत आहे.