धक्कादायक ! बाप नजरेआड होताच नराधमाने मतिमंद मुलीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम आरोपीने एका मतिमंद मुलीवर सगळ्या हद्दी पार करत लैंगिक अत्याचार करून तिला बेदम मारहाण केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील शेतात गेल्यानंतर, हा प्रकार घडला. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पीडित तरुणी मंतिमंद असून तिला अधून मधून वेडसरपणाचे झटके येतात. झटके आल्यास ती आसपासच्या लोकांना मारहाण करायला सुरुवात करते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आपल्या शेतात एक पत्र्याचं शेड उभारलं आहे. त्या ठिकाणी या मुलीला ठेवण्यात आलं आहे.

या मुलीसोबत नेहमी कुटुंबातील एक ना एक व्यक्ती असते. घटनेच्या दिवशी देखील पीडित मुलीचे वडील तिच्यासोबत होते. मात्र हि घटना घडली तेव्हा वडील आजारी असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी गावात जायचं होतं. त्यामुळे वडिलांनी पीडितेला शेडमध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावलं आणि गावात निघून गेले. यानंतर गावात उपचार घेतल्यानंतर ते शेतात जाण्याऐवजी घरीच झोपले. यावेळी आरोपीने शेडचे कुलूप तोडून मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केला तसेच बेदम मारहाण देखील केली.

यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वडील शेतात गेले, तेव्हा शेडचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत होते तर पीडित तरुणी आतमध्ये तरुणी जखमी अवस्थेत पडली होती. हे पाहून मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर वडिलांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बेंबळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.