आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. याअंतर्गत कोणताही ग्राहक फूड मेन्यू स्कॅन करू शकतील आणि त्यांच्या फोनद्वारेच ऑर्डर देऊ शकतील.

डिजिटल पेमेंट देखील उपलब्ध असेल
त्याअंतर्गत त्यांना आपले वॉलेट, कार्ड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट देण्याची सुविधा असेल. रेस्टॉरंट्स व्हाइट लेबल प्रोडक्ट म्हणून याचा वापर करू शकतील, जिथे ते त्यांचे लोगो, ब्रँड कलर इत्यादी पॅम्पलेट, होर्डिंग्ज आणि साइनबोर्डवर वापरू शकतात. यासाठीच्या पहिल्या टप्प्यात १ लाख रेस्टॉरंट्समध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.

याच्या लॉन्चिंगच्या पहिल्या टप्प्यात पेटीएम ही सुविधा १ लाख रेस्टॉरंट्समध्ये देईल. पेटीएमचा हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे जेव्हा केंद्र सरकारने ८ जून रोजी देशभरातील हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास मान्यता दिली आहे.

पेटीएमचे उपाध्यक्ष निखिल सिंघल म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरिंग सिस्टम अंतर्गत या व्यवसायिक संघटना आपला व्यवसाय सुरू करण्यास सक्षम होतील आणि त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करून सध्याच्या साथीला टालू शकतील.”

गेल्या महिन्यातच कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या सुट्टीतील काही दिवसाचे योगदान देण्यास सांगितले होते. या संस्थांच्या बॅलन्सशीटवर या प्रणालीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि त्यांच्या नफ्यामध्ये वाढही होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, कंपनीच्या दुसर्‍या अधिकाऱ्यांचा हवाला देत असे म्हटले होते की, आमचे हे पाऊल अल्पावधीत होणाऱ्या परिणामाची भरपाई करण्यास सक्षम असेल आणि दीर्घावधीसाठी कंपनी आणि कर्मचार्‍यांसाठीदेखील हे चांगले असेल.

अलीकडेच कंपनीने आपल्या ई-कॉमर्स व्हेंचर पेटीएम मॉलचे मुख्यालय नोएडाहून बंगळुरू येथे हलविले आहे. आता कंपनी आपल्या उत्पादन आणि तंत्रज्ञान विभागात ३०० लोकांना कामावर घेण्याचा विचार करीत आहे. पेटीएम मॉलने असा दावा केला आहे की, गेल्या आर्थिक वर्षात प्रत्येक तिमाहीत तोटा १७ मिलियन डॉलर्सवरून २ मिलियन डॉलरवर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment