सोमवारपासून ‘मेस्टा’ ने घेतला शाळा उघडण्याचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने शासनाने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सोयी- सुविधांअभावी घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत सरसकट बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेने 11 व 12 जानेवारी दरम्यान संस्थाचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. दोन वर्षांपासून कोरोनाचा सबबीखाली मुलांचे मोठ्या प्रमाणात झालेले शैक्षणिक नुकसान, तसेच पालकांचे शाळा बंद करण्याची मागणी आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती सर्वानुमते शाळा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना संदर्भातील सावधगिरीचे सर्व नियम पाळून जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा 17 जानेवारीपासून सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मंडळाचे संस्थापक संजय तायडे यांनी सांगितले.

Leave a Comment