औरंगाबादेतील घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार अत्याधुनिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : घरगुती वीज ग्राहकाच्या मिटर रिडींगबाबतचा विविध तक्रारीवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद या सारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. दर्शन राऊत यांनी याबाबत निर्देश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहेत. मोबाईलच्या सिम कार्ड वापरा प्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड स्वरूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रीपेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत, त्यानुसारच वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास त्यामुळे फायदा होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये फेरफार करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीज चोरीस आळा बसेल.

विजेचा काटकसरीने विवेकी वापर करायला प्रोत्साहन मिळेल. स्मार्ट मीटरमुळे दुरुस्त पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीज भरायचे व्यवस्थापन अगदी कमीत कमी वेळात करता येईल. याचा फायदा ग्रेडचे व्यवस्थापन स्मार्ट पद्धतीने करता येणे शक्य आहे. दुरुस्त पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल, ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच एखाद्या दुरुस्त पद्धतीने बसून मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परीक्षणासाठी घेतला जाऊ शकतो. या मीटर योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी निर्देश दिले.

Leave a Comment