पराठा स्पेशलमध्ये आज शिका मेथी केळ्याचे पराठे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र – मेथी केळ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य ,

साहित्य – मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा, चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक

कृती – १) प्रथम मेथी धुवून बारीक चिरून घयावी.

२) पिकलेल्या केळ्यांची साले काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून घ्यावे.

३) कढईत तेल तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे टाकून थोडेसे परतून घ्यावे. नंतर त्यातच ओवा, तीळ,साखर,लाल तिखट,हिंग ,हळद,मीठ टाकून परतून घ्यावे.

४) या मिश्रणात चिरलेली मेथी टाकून सर्व मिश्रणाला एक वाफ आणावी.

५) हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात रवा, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, टाकून व शेवटी त्यात मावेल तितकीच किणक टाकून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात पाणी घालू नये. )

६) तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.

७) या गोळ्यांचे फुलक्यांच्या आकाराचे पराठे लाटून घ्यावेत व म्ध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत. (भाजताना वाटल्यास थोडे तेल सोडावे. )

८) गरम गरम पराठे आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत सर्व्ह करावे.

Leave a Comment