हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Metro Accident Compensation । मेट्रो प्रवास हा भारतातील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनला , सरकारने मेट्रो रेल्वे नियम , २०२५ अंतर्गत मेट्रो रेल्वे अपघातांसाठी भरपाई रचनेत एक मोठा बदल केला आहे. प्रवासादरम्यान दुखापत किंवा मृत्यू झाल्यास प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने या नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. या सुधारती तरतुदी भारतातील सर्व मेट्रो-ऑपरेटिंग शहरांमध्ये लागू होणार असून, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, पुणे, नागपूर, नोएडा, कोची, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे.
नवीन नियमानुसार किती भरपाई मिळणार– Metro Accident Compensation
नवीन नियमांनुसार, भरपाईच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे, जर मेट्रोशी संबंधित अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आता जास्तीत जास्त ८ लाख रुपयांची भरपाई (Metro Accident Compensation) मिळेल, जी २०१७ मध्ये निश्चित केलेल्या ५ लाख रुपयांच्या पूर्वीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक हात आणि एक पाय गमावणे यासारख्या गंभीर दुखापतींसाठी, प्रवाशांना आता ८ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते, जी पूर्वी ४ लाख रुपये होती. हे बदल नुकसानभरपाईची तीव्रता आणि आधुनिक राहणीमानाच्या खर्चाशी जुळवून घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.
इतर दुखापतीच्या भरपाई बाबत देखील सुधारणा
तसेच इतर दुखापतीच्या भरपाईबाबत (Metro Accident Compensation) देखील सुधारणा झाल्या आहेत, त्यामध्ये कंबरेच्या सांध्यातील फ्रॅक्चर किंवा पायाच्या प्रमुख हाडांच्या फ्रॅक्चरसाठी आता १.६ लाख रुपये भरपाई मिळेल. तर पाठीचा कणा फ्रॅक्चर, ज्यामुळे अर्धांगवायू होत नाही परंतु हालचाल करण्यास अडथळा येतो, त्याला २.४ लाख रुपये भरपाई दिली जाईल.आणि सोम्य अर्धांगवायू झाल्यास, ४ लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.
यात महत्त्वाचे म्हणजे, सुधारित कायद्यात सूचीबद्ध नसलेल्या दुखापतींसाठी एक कलम देखील समाविष्ट आहे. ज्या मध्ये दुखापतीचे स्वरूप अधिकृत यादीत नमूद केले नसेल परंतु पीडित व्यक्तीला कामासाठी कायमचे अयोग्य ठरवत असेल तर न्यायालयीन आदेशानुसार,त्या पीडित व्यक्तीला भरपाई म्हणून ४ लाख रुपये मिळतील. तर अशी नवीन सुधारित मेट्रोची नियमावली समोर आली आहे.