अरे व्वा!! आता Google Map वरून बुक करता येणार Metro चे तिकीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मेट्रो ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता ऑनलाईन पद्धतीने मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या अँपची गरज नाही, कारण तुमच्या मोबाईल मध्ये आधीपासूनच असलेल्या गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून तुम्ही मेट्रो तिकीट (Metro Ticvketकाढू शकता. भारतात आयोजित करण्यात आलेल्या गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात गूगलने भारतासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. गूगलने केलेल्या घोषनेनुसार भारतातील सर्व मेट्रो नेटवर्क असलेल्या शहरातील मेट्रोचे तिकीट आता भारतातील लोक गुगल मॅप या अँपच्या साहाय्याने काढता येतील. त्यासाठी तुम्हाला मेट्रोचे वेगळे अँप आता डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही.

गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात केलेल्या घोषनेनुसार लवकरच भारतातीलसर्व शहरांमधील मेट्रोसाठी आवश्यक मॅप आणि मेट्रो फेऱ्याबद्दल माहिती गूगल मॅपच्या माध्यमातून मिळणे शक्य होणार आहे. तसेच मेट्रोचे तिकीट सुद्धा तुम्ही गुगल मॅप वरून बुक करू शकणार आहे. गूगल मॅप वरून तिकीट बुक करताना गूगलचे स्वतःचे पेमेंट अँप गुगल पे वापरले जाऊ शकेल . ज्याच्या माध्यमातून तुम्ही UPI च्या माध्यमातून पेमेंट करू शकाल . यासाठी गुगल मॅपनं देशातील ओपन डिजिटल ई- कॉमर्स नेटवर्क (ONDC) सह भागीदारी केली आहे.

गुगल क्लाउड इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम बेदी सांगितले की, जी बायर अ‍ॅपसह ओपन नेटवर्कशी इंटीग्रेटेड असेल. यावर्षी च्या सुरुवातीला गुगलनं ONDC सह भागीदारी करून सेलरसाठी एक प्रोग्राम लाँच केला होता.त्यानुसार हे अँप काम करेल .गुगल मॅपवरून मेट्रो तिकीट बुक करण्याची सुविधा पुढील काही महिन्यांमध्ये सर्व मेट्रो सिटीमध्ये सुरु होईल अशी आशा त्यांनी वक्त केली आहे.